नंदुरबार शहरात अवैध धंद्यांवर अखेर धाडसत्र

0

नंदुरबार । शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी वक्रदृष्टी टाकून कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेला तारांकित आणि दै. जनशक्तीने त्यावर टाकलेला प्रकाश झोत याचा इफेक्ट्स होऊन पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. शहीदांच्या भूमीत सट्टा, जुगार,कवडी गेम आदी विविध प्रकारचे अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणावर मोटार सायकल चोरीचे सत्र सुरू असून त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. ही वास्तवता आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत मांडली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत दै. जनशक्तीने वास्तविकता दर्शविणारे वृत्त प्रकाशित केले होते.

यांनी टाकली धाड
याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ठीक ठिकाणी छापा टाकून अवैध धंदे करणार्‍यांवर कारवाई सुरू केल्राने सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.