नंदुरबार। एका वेडसर माणसासोबत आलेल्या जंगली माकडोन दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. या दोघांच्या कारनाम्यांमुळे लहान मुलांसाठी, मनोरंजनाचा खेळ बनला आहे. तर मोठ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. नंदुरबार शहरातील वाघेश्वरी चौफुली, विद्यानगर या भागात एका वेडसर, माणसासोबत जंगली माकडाचे आगमन झाले. कंबरेला शर्ट गुंडाळून उघडा फिरणार्या या माणसाबरोबरच त्याच्यासोबत असलेल्या माकडाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्या माणसाच्या इशार्यावरच माकडाची हालचाल होते. त्या माणसाला कुणी हटकल तर ते माकड अंगावर धावून जात आहे. शनिवारी दिवसभर या दोघांच्या करामती नंदनगरीतील नागरिकांनी पाहिल्या. परंतु रविवारी सकाळच्या सुमारास धुळे रस्त्यावर असलेल्या गणेशनगरमध्ये तर या दोघांनी प्रचंड धुमाकूळ घालत दहशत पसरविली.
पोलिसांना बोलवून वेडसराला दिले ताब्यात
प्रा.रमेश चौधरी यांच्या प्लॅटमध्ये एका भाडेकरूच्या घरात तो वेडसर माणूस आणि माकडाने प्रवेश केला. हे पाहून फ्लॅटमधील सर्व कुटुंब अचंबीत झाले. त्या माणसाला हटकविण्याचा प्रयत्न केला असता एका तरूणांवर माकडाने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. रमेश सरांच्या बिल्डींगमधून माणुही जाईना व माकडही हालेना, जणू त्या दोघांनी बिल्डींगचा ताबाच घेतल्याचे चित्र दिसत होते. ही सारी लिला पाहण्यासाठी गणेशनगरमध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे त्या वेडसर माणसाची भाषा, बंगाली स्वरूपाची असल्याने तो काय बोलता ते सार्यांच्या डोक्यावरून जात होते, शेवटी पोलिस गाडीला बोलवून त्या माणसाला ताब्यात देण्यात आले. माकड मात्र फरार झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.