नंदुरबार । केवळ स्वार्थ असलेले विकास काम करायचे व त्यातून भ्रष्टाचार करायचा आणि सातत्याने नंदुरबारवासीयांची दिशाभूल करायची, ऐवढेच काम आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आणि लोकांना विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत, नंदुरबार शहराला काँग्रेसमुक्त करून परिवर्तन घडवावे , असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले. सुभाष चौकात भाजपच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, आमदार वीजयकुमार गावीत, आमदार शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी हे उपस्थित होते.
निधी कमी पडू देणार नाही यावेळी नगरसेवक ईश्वर चौधरी, श्याम मराठे, चारूदत्त कळवणक व अन्य सर्व नगरसेवकपदाचे भाजपा उमेदवार देखील उपस्थित होते. खर्या विकासापासून नंदुरबारला वंचित ठेवल्याची टीका आमदा शिरीष चौधरी यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारले असून लोकांनी जर पालिका सोपवली तर निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाला सत्ता सोपविण्याचे आवाहन आमदार विजयकुमार गावित यांनी केले. खासदार डॉ. हिना गावीत यांनी केलेल्या विकास कामांची डॉ. रवींद्र चौधरी यांनी माहिती दिली.