नंदुरबार । जिल्हाभरातील नंदुरबार, तळोदा, शहादा, नवापूर पालिका विषय समिती सभापतींची आज निवड करण्यात आली. नंदुरबार, शहादा, तळोद्यात ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. नवापूरात मात्र, महिला व बालकल्याण व बांधकाम समितीसाठी राष्ट्रवादीकडून दोन अर्ज आल्याने या निवडीसाठी मतदान घेण्यात आले. मात्र, संख्याबळ काँग्रेसचे जास्त असल्याने काँग्रेसचा विजय झाला. दरम्यान, नवापूरात आरोग्य समिती निवडीदरम्यान अर्जावर आक्षेप आल्यानंतर तपासणीनंतर चुका आढळल्याने एकमेव अर्ज बाद ठरविण्यात आल्याने कुणाचीही निवड होऊ शकली नाही. ही प्रक्रिया नंतर राबविली जाणार असल्याची माहिती आहे. संख्रा बळ अधिक असल्राने ही निवड आधीच निश्चित होती. आज केवळ औपचारिक घोषणा झाल्राचे चित्र होते.
शहाद्यात काँग्रेसचे सर्वाधिक 16 नगरसेवक
शहादा पालीका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ राहुल वाघ, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी , नगरसेवक मकरंद पाटील सह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभापतींची निवड ही केवळ औपचारिकता होती. सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या गटाकडे पुर्ण बहुमत नाही त्यांच्या गटाकडे 10 भाजपा एक राष्ट्रवादी असे एकूण 11 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसकडे एकूण 16 नगरसेवक असुन बहुमत आहे. सर्व पाचही सभापती पुन्हा काँग्रेस गटाकडे गेले त्यात काँग्रेच चार व एमआयएमपक्षाचा चा एक आहे. आज निवड झालेल्या सर्व सभापतीची नावे आदल्या दिवशीच विरोधी गटाचे नेते सातपुडा साखरकारखाना चेअरमन दीपक पाटील यांनी निश्चित केले होते. सर्व अधिकार दिपक पाटील यांना देण्यात आले होते.
शहाद्याचे सभापती असे
नूतन सभापती पुढीलप्रमाणे शिक्षण समिती सभापती लक्ष्मण नथ्थु बढे, महिला बाल कल्याण समिती सभापती वर्षा राजेंद्र जव्हेरी, आरोग्य समिती सभापती सैय्यद सायराबी लियाकत अली सै, बांधकाम समिती सभापती संगीता योगेश चौधरी, पाणीपुरवठा समिती सभापती ज्योती एकनाथ नाईक यांच्या समावेश करण्यात आला आहे. नुतन सभापतींचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सुनिल सखाराम पाटील. माजी नगराध्यक्ष विजय दामु पाटील ,माजी नगरसेवक संजय चौधरी सह नगरसेवकांनी अभिनंदन केले. नगराध्यक्ष दालनात रिपाइं जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर, मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, संतोष वाल्हे, एकनाथ नाइक, राजेश जव्हेरी यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर सर्वांनी जल्लोष केला. शहराच्रा सर्वांगिन विकासाचा मानस सर्वांनी व्रक्त केला.
फटाक्यांची आतिषबाजी
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी सर्व सभापतीना शहराच्या विकासासाठी आता पर्यंत जे योगदान दिले तसे सहकार्य ठेवावे सर्वांचा सहकार्यानेच विकासाची कामे होतील. जनतेचा समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्या जबाबदारी मोठी आहे एक दिलाने काम करा असे आवाहन केले. नगरपालिका कार्यालयाबाहेर नवनिर्वाचित सभापती व काँग्रेस नगरसेवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
विषय समिती निवड अशी
स्थायी समिती ः मोतीलाल पाटील (सभापती) रेखा चौधरी, संगीताचौधरी, सैय्यद सायराबी लियाकत आली, ज्योती नाईक, वर्षा जोहरी, लक्ष्मण बढे, अकलाख अह रहीम अन्सारी, प्रशांत निकुंभे, वाहिद शे. रशीद पिंजारी.
सार्वजनिक बांधकाम समिती ः संगीता चौधरी (सभापती), शहेनाज अजहरखान पठाण, संगीता मंदील, रियाज अहमद कुरेशी, संदीप पाटील, योगिता वाल्हे, वासिम सलीम तेली.
स्वच्छता,वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती ः सायराबी लियाकत अली (सभापती), उषाबाई कुवर, शहेनाज अजहरखान पठाण, सुमनबाई पवार, संजय साठे, विद्या जमदाळे, योगिता वाल्हे.
नियोजन व विकास समिती – रेखाबाई चौधरी ( सभापती), शहेनाज अजहरखान पठाण, शमीमबी हकीम कुरेशी, इकबाल शे सलीम शेख, रिमा पवार, संजय साठे, वासिम सलीम तेली.
पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती – ज्योती नाईक, ( सभापती), सुमनबाई पवार, शमीमबी कुरेशी, आनंदा पाटील, सईदाबी साजिद अन्सारी, विद्या जमदाळे, वासिम सलीम तेली.
महिला व बालकल्याण समिती – वर्षा जोहरी ( सभापती), सुमनबाई पवार, संगीता मंदील, रिमा पवार, रेखा पाटील, सईदाबी साजिद अन्सारी, जहेदाबी शे. रहीम पिंजारी. शिक्षण समिती – लक्ष्मण बढे ( सभापती), उषाबाई कुवर, संगीता मंदील, आनंदा पाटील, संदीप पाटील, अनिता पाटील, जहेदाबी शे. रहीम पिंजारी.
नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी स्थायी समिती सभापती
नंदुरबार । नगरपालिका विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली असून, स्थायी समिती सभापतीपदी ( पदसिद्ध ) नगरध्यक्षा रत्ना रघुवंशी, नियोजन समिती सभापती ( पदसिद्ध) उपनगराध्यक्ष शोभाताई मोरे यांची तर सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी कुणाल वसावे, शिक्षण समिती सभापतीपदी सोनिया राजपूत, स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य सभापती पदी श्रीमती शारदाबाई ढंढोरे, पाणीपुरवठा सभापती पदी कैलास पाटील तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी श्रीमती कुरेशी महफीदाबानो यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रांताधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यासी अधिकाराखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी उपनगराध्यक्ष शोभाताई मोरे मुख्याधिकारी गणेश गिरी सहाय्यक कार्यालय अधीक्षक एस. एम गुलाले उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व सभापतींचा मान्यवरांनी सत्कार केला.
नंदुरबारातील सभापती व सदस्य
स्थायी समिती : सभापती ( पदसिद्ध ) नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी सदस्य – शोभाताई मोरे, कुणाल वसावे, सोनिया राजपूत, शारदाबाई ढंढोरे, कैलास पाटील, श्रीमती कुरेशी महफिदाबानो,खान परवेज करामत, रवींद्र पवार,प्रवीण चौधरी.
नियोजन आणि विकास समिती : सभापती ( पदसिद्ध ) उपनगराध्यक्ष शोभाताई मोरे, सदस्य- नगरसेविका ज्योती पाटील, नंदा जाधव, दीपक दिघे, जागृती सोनार,अमित रघुवंशी, रमेश सोनवणे,चारुदत्त कळवणकर , रेखा चौधरी, आनंदा माळी.
बांधकाम समिती : सभापती कुणाल वसावे, सदस्य नगरसेवक प्रमोद शेवाळे, अमित रघुवंशी,श्रीमती मेमन मेहरुन्निसा, ज्योती पाटील, जागृती सोनार, गौरव चौधरी, नीलेश पाडवी, आनंद माळी,हर्षा बाफना.
शिक्षण समिती : सभापती सोनिया राजपूत सदस्य- नगरसेविका भारती राजपूत, शे.इम्रान, यशवर्धन रघुवंशी, दीपक दिघे, चारुदत्त कळवन कर , निलेश माळी,रेखा चौधरी, अर्जुन मराठे.
स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य : सभापती- श्रीमती शारदाबाई ढंढोरे सदस्य – नगरसेविका मनिषा वळवी, मंगलाबाई माळी, राकेश हासानी,यशवर्धन रघुवंशी, कसाई रोशन शेख, संगीता सोनवणे, प्रशांत चौधरी, संगिता वसईकर, भावना गुरव.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : सभापती – कैलास पाटील, सदस्य – नगरसेवक राकेश हासानी, किरण रघुवंशी, दीपक दिघे, सुरेखा मराठे, कसाई रोशन, कल्पना चौधरी, सिंधूबाई माळी, निलेश माळी कल्याणी मराठे.
महिला व बालकल्याण समिती : सभापती – श्रीमती कुरेशी फहमीदाबानो, सदस्य नगरसेविका नंदा जाधव, सुरेखा मराठे, मंगलाबाई माळी, भारती राजपूत, कल्पना चौधरी सिंधुबाई माळी, रेखा चौधरी, भावना गुरव.
तळोदा पालिकेत बिनविरोधची घोषणा
तळोदा । तळोदा नगर परिषदेत सभेत पीठासीन अधिकारी योगेशजी चंद्रे, तहसीलदार तळोदा यांनी काम पाहिले तर नामनिर्देशन पत्रे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी स्वीकारले. एकूण पाच समितीसाठी पाच सदस्य राहतील हे निश्चित करून उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती राहतील हे घोषित करण्यात आले. इतर 4 समित्या साठी चारच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने छाननी अंती चारही अर्ज पीठासीन अधिकारी नी वैद्य ठरविले तदनंतर 15 मिनिटे वेळ देवून ही कोणीही मागार न घेतल्याने सर्व विषय समिती सभापती ची निवड बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारीनी घोषित केले.
सभापती व सदस्य असे
स्थायी समिती : सभापती अजयभैय्या परदेशी तर सदस्य भाग्यश्री चौधरी, सूनयना उदासी,सविता पाडवी, अंबिका शेंडे, भास्कर मराठे
नियोजन व विकास : सभापती भाग्यश्री योगेश चौधरी तर सदस्य सुरेश पाडवी, रामानंद ठाकरे, संजय माळी, सुभाष चौधरी.
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापतीपदी भास्कर दत्तू मराठे तर सदस्य म्हणूनबेबीबाई पाडवी, योगेश पाडवी,हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी.
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती पदी सूनयना अनुपकुमार उदासी तर सदस्य म्हणून सुरेश पाडवी, योगेश पाडवी, संजय माळी, सुभाष चौधरी.
पाणीपुरवठा व जलनिसरण समिती : सभापतीपदी सविता नितीन पाडवी तर सदस्य रामानंद ठाकरे,अमोनोद्दीन शेख गौरव वाणी, सौ कल्पना पाडवी.
महिला व बाल कल्याण समिती : सभापतीपदी अंबिका राहुल शेंडे तर सदस्या म्हणून बेबीबाई पाडवी,शोभाताई भोई,अनिता परदेशी, कल्पना पाडवी इत्यादी ची निवड करण्यात आली. अल्पसंख्याक कल्याण करीत जिल्हा स्तरीय सनियंत्रण समितीचे सदस्य म्हणून शेख अमोनोद्दीन यांची स्थानिक स्वराज्य पंचायतराज संस्थचे प्रतिनिधी म्हणून शिफारस करण्यात आली आहे.