नंदुरबार संवेदनशील शहरात पोलिस प्रतिमा डागाळली

0

अवघ्या चार महिन्यातच शहर पोलिस निरीक्षक दिपक बुधवंत यांची नियंत्रण कक्षात झालेल्या बदलीनंतर शहर पोलिस स्टेशनला कुणीही पोलिस निरीक्षक काम करायला मागत नाही, या कारणामुळे कामात स्वारस्य नाही अशी स्थिती निर्माण झाली असुन जिल्हा मुख्यालयची व अतिसंवेदनशील यहराची सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनी हे शहर वार्‍यावर सोडले की, काय अशी शंका येऊ लागली असुन 10 ऑक्टोंबर रोजी ततलीन शहर पोलिस निराक्षकचे दिपग बुधवंत यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी संजय माथुरे व दुसरे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण या दोघांचीही नियुक्ती करण्यात आलेली असुन 1 जुन रोजी शहर पोलिस निराक्षक म्हणुन धडगावहून दिपक बुधवंत यांना तत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेवुन मागविण्यात आले असुन तथापी राजा बदलला की, प्रशासन बदलते म्हणून बुधवंत यांना अवघ्या चार महिन्यात नियंत्रण कक्षात बोलवले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी संजय माथुरे यांची नियुक्ती करण्यात आली असुन शहराची गुन्हेगारी त्याचप्रमाणे राजकीय परिस्थिती मोर्चे आंदोलन ही पोलिस निरीक्षक माथुरे यांच्या आवक्याबाहेर असल्याचे लक्षात येताच त्यांनी महत्त्वाच्या वेळी पोलिस निरीक्षक संजय माथुरे यांनी सिक रिपोर्ट केल्याचे दिसुन आले व डोकेदुखी दुसरे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना हाताळावी लागल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यात वारंवार घडले असुन महिन्याभरानंतर संजय माथुरे यांनी कार्यभार स्वीकारला असल्यामुळे तेवढ्याच दुसरे पोलिस निरीक्षक रूजु आले असुन शहर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षकांची काही पदे रिक्त आहेत.

6 महिन्यांनपुर्वी एलसीबीचे निरीक्षक गिरीष पाटील यांची तडकाफडकी अदली झाल्यामुळे त्यांच्या जागी सीष्मओ प्रभावातुन नासिक एल.सी.बी. तून किशोर नवले यांनी नियत कार्यकाळ पूर्ण झाला नसतांना त्यांची उचलबांगडी झाली असल्यामुळे सध्या पोलिस निरीक्षक गिरीष पाटील वाहतूक शाखा सांभाळत आहे. जिल्ह्यातील आता त्यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला असुन त्यांच्यासह उपनगराचे संदीप रणदिवे बदलीला पात्र आहेत. तर तालुक्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर निवृत्तीला आहेत. त्याचपद्धतीने शहर पोलिस स्टेशन मधुन 4 महिन्यात नियंत्रण कक्षात पाठविलेल्या दिपक बुधवंत यांनी शासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे आपल्या पदस्थापनेसोबत याचीका दाखल केली असुन शहरातील पोलिस ठाण्याच्या संपूर्ण कारभार डी.वाय.एस.पी.रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरळीत चालु असुन शहरातील प्रत्येक घडणार्‍या गुन्ह्यासाठी रमेश पवारांना यावे लागत आहे. थोडक्यात सांगायचे तर शहर पोलिस स्टेशनला आलेल्या निरीक्षकांची व शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेप्रती आस्था राहीलेली नसल्यामुळे या शहरात कधी काय होईल सांगता यंत नाही.

पतंग उडवण्यावरून, सायकलीचा धक्का लागल्यावरून जुगार खेळल्यावरून दंगली झाल्या आहेत. या शहराची पोलिस यंत्रणा सध्या अत्यंत कुचकामी झाल्याचे चित्र आढळुन आले आहे. पोलिस अधिकारी भ्रष्ट असला तरी परवडतो मात्र गुन्हेगारांवर त्याचा वचक राहीला पाहिजे. आपल्याला माहितीच आहे की, कोणत्याही कारण्यासाठी शहर बंद होते. व पोलिस कारवाई विरोधातही बंद पुकारला जातो यापेक्षा मोठी नामुष्की यापुर्वी नंदुरबारकरांनी आजपर्यंत कोणीही पाहिली नाही. त्याचप्रमाणे संजय पाटील यांनी या संवेदनशील शहराच्या कायदा व सुव्यवस्था तसेच लोप पावलेल्या पोलिस प्रतिमेची काळजी घ्यायला हवी अशी माफक अपेक्षा शहरवासीयांतून तळमळ व्यक्त होत असल्याचे दिसुन येते आहे.नंदुरबार शहरातील घडणार्‍या घटनांना जेवढे पोलिस यंत्रणा जबाबदार आहेत तेवढीच लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि नागरीकही सुद्धा जबाबदार आहेत. साधी फिर्याद देण्यासाठी एक माणूस येतो पण त्याच्यासोबत 40 ते 50 लोक पोलिस स्टेशनला येत असतात. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढल्यासारखा प्रकार सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतो आहे.

रवींद्र चव्हाण
नंदुरबार 9423194841