नंदुरबार सह दुय्यम निबंधक कार्यालयात चोरी

0

नंदुरबार । शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालय फोडून अज्ञात चोरांनी संगणक संच सह सुमारे पावणे 2 लाख 75 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग-2 मध्ये ही चोरी झाली आहे. 25 ते 27 जानेवारी दरम्यान चोरांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी 1 लाख 12 हजार 740 रुपये किंमतीचा सी.पी.यु, 1 लाख 33 हजार 32 रुपये किमतीचे मॉनिटर, 25 हजार 333 रुपये किमतीचे एल.सी.डी. असा एकूण 2 लाख 71 हजार 105 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेलं आहे. सुट्टी असल्याची संधी साधत चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे. याबाबत कार्यालयातील लिपिक मंसाराम छगन सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.