जळगाव । नोट बदलीच्या संशयावरुन जिल्ह्यात 24 दिवसांत चौथ्यांदा आलेल्या अन्वेषण विभागाच्या पथकाने दुसर्या दिवशी उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदु महाजन यांची कसुन चौकशी केली. यावेळी वाणींच्या समवेत त्यांचा मुलगा ही उपस्थित होता. चोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून चलनातून बाद झालेल्या 73 लाख रुपयांच्या नोटा बदलल्याचा त्यांचावर संशय आहे. शुक्रवारी 24 रोजी सीबीआय पथकाने जिल्हा परिषदेत येऊन वाणी यांच्या कार्यालयाची झाडा झडती घेतली. मात्र ते सुटीवर असल्याने त्यांच्या जागी कारभार पाहणारे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील यांच्या समक्ष त्यांच्या दालनाची चौकशी करण्यात आली. वाणी शुक्रवारी रात्री 10 वाजता निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर रात्री 3 वाजेपर्यत चौकशी सुरु होती. शनिवारी 25 रोजी पुन्हा बीएसएनएल कार्यालयात ही चौकशी सुरु करण्यात आली. नोट बदलीचे कनेक्शन थेट जिल्हा परिषदेत पर्यत असल्याने संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे लागुन आहे.
तीन वाजता वाणींची चौकशीतून सुटका
नंदकुमार वाणी यांची सीबीआयने सलग दुसर्या दिवशी चौकशी केली. बीएसएनएल कार्यालयात दुसर्या दिवशी झालेल्या चौकशीत त्यांच्या सोबतच त्यांचा मुलगा देखील हजर होता. सकाळी 10.30 वाजता नंदु वाणी यांना बीएसएनएल कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर दुपारी 3.15 मिनीटांनी त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर ते त्यांच्या खाजगी वाहनाने (क्र- एमएच 19.एपी. 1213) निवासस्थानी रवाना झाले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा बोलविण्यात आले असल्याचे सांगत ते
निघून गेले.
रात्री 3 वाजेपर्यत चौकशी
नोटाबदलीच्या संशयास्पद व्यवहारात जिल्हा परिषदेतील चौथे संशयित नंदु वाणी हे मुलाचे लग्न असल्याने सुटीवर होते. त्यांनी आधी 10 मार्चपर्यत सुटी घेतलेली होती. दरम्यान जिल्हा परिषदेतील तीन कर्मचार्यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्याने त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतली. त्यांचवेळी त्यांच्यावर संशय बळावला. महिनाभरापासून ते सुटीवर आहे. जिल्हा परिषदेत दुसर्यांदा आलेल्या सीबीआय पथकाला वाणी उपस्थित नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पंचांसमक्ष त्यांच्या घराची चौकशी करावी लागली अखेर रात्री 10 वाजता वाणी घरी आले. त्यांच्या मुलाची व मुलाच्या ऑफीसची रात्री 3 वाजेपर्यत चौकशी सुरु होती.
पथक सायंकाळपर्यत थांबून
सीबीआय पथक सलग दुसर्या दिवशीही शहरात थांबून होते. पहिल्या दिवशी रात्री वाणी यांच्या घरी जाऊन उशीरापर्यत चौकशी केल्यानंतर दुसर्या दिवसी बीएसएनएल कार्यालयात चौकशी केली. सकाळी 10.30 वाजेपासून दुपारी 3.15 वाजेपर्यत चौकशी करण्यात आली. दुपारनंतर नंदु वाणी यांची सुटका करण्यात आली. मात्र सीबीआय पथक सायंकाळ पर्यत कार्यालयात थांबून होते.