नंदूरबार। जिल्ह्यांत एसटीच्या 69व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बस स्थानकांची स्वच्छता करून त्यांना सजविण्यात आले होते. तसेच प्रवाशांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. बसस्थानक नववधू सारखे सजविण्यात आले होते. बसस्थानकांच्या आवारात रांगोळ्या काढून बसस्थानक सुशोभित करण्यात आले होते. स्पर्धेत टिकण्यासाठी चांगली सेवा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवापुरात प्रवाशांचे फुल देऊन स्वागत
नवापुर । येथे वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता नवापुर बस स्थानक येथे वर्धापन दिनाचे डीजीटल ब्रेनर लावण्यात आले होते. त्यानंतर बसस्थानकात केळीचे पाने लावण्यात आली. तसेच परीसर स्वच्छ करण्यात आला. बसस्थानक आवारात चुना मारुन आखणी करण्यात आली. वर्धापनदिन निमित्त बसस्थानक नववधुसारखी सजविण्यात आले होती. त्या नंतर विभागीय सुरक्षा अधिकारी क्षिरसागर व आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी बसस्थानक आवारात उभे असलेल्या प्रवाशांना फुल देऊन व पेढा देऊन स्वागत सत्कार केला. तसेच बसमध्ये बसलेले प्रवासी यांना पण फुल देऊन सत्कार करण्यात आला.
शहादा येथे रांगोळी काढून सजावट
शहादा । येथील आगारात राज्य परिवहन महामंडळच्या वर्धापनदिनानिमीत्ताने बसस्थानक आवार सुशोभित करण्यात आले. गुलाब पुष्प देउन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रवाशांनी देखील राज्यपरिवहन महामंडळाच्या अधिकार्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार अधिकारी शिवाजीराव घोरपडे सहाय्यक कार्यशाळा अधिकारी प्रदीप पावरा, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, वहातूक नियंत्रक मिर्झा, आगारलेखाकार गौतम पावरा उपस्थित होते. प्रथम शिवाजीराव घोरपडे, संजय कुलकर्णीसह मान्यवरांनी प्रत्येक बसमध्ये जाऊन प्रवाशांना गुलाब पुष्प देउन स्वागत केले. या निमीत्ताने आवारात रंगीबेरंगी पताका, केळीचे खांब, आंब्याच्या झाडाची पाने लाऊन सजावट करण्यात आली होती. आगारातील सर्व बसेस पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आल्या. महिला कर्मचार्यांनी ठीकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. याप्रसंगी बोलतांना शिवाजीराव घोरपडे यांनी प्रवासी हा केंद्रबिंदू मानुन त्यांना सेवा द्या. प्रवाशांनी बसमधून सुरक्षित प्रवास करावा. राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचार्यांनी प्रवाशांना चांगली सेवा द्यावी त्यांच्या सन्मान करावा. प्रवाशांमध्ये वाढ होइल असे सांगून शुभेच्छा दिल्या. तर स्थानक प्रमुख कुलकर्णी यांनी बससेवाही आजच्या युगात सर्वात चांगली सेवा आहे. स्पर्धा आहे स्पर्धेत टिकण्यासाठी चांगल्या प्रकारची सेवा महत्वाची आहे म्हणून कर्मचार्यानी संकल्प करावा. कर्मचारी व प्रवासी यांच्यात समन्वय साधावा असे आवाहन केले. प्रास्ताविक संजय कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदीप पावरा यांनी व्यक्त केले.
चहापान व उपाहाराचा कार्यक्रम
यानंतर बसस्थानकावर भव्य अशा रांगोळया काढण्यात आल्या होता. प्रत्येक बस चालकास व वाहक यांना प्रवासी वाढवा प्रवासी जोडा त्यांचाशी शांतेत बोला असे आहवान आगार प्रमुख अहिरे यांनी केले. यानंतर दुपारी 3 वाजता नवापुर आगार विभागात चहापाण व अल्पोहाराचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार प्रमोद वसावे,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, सतोंष भंडारे, दिपक पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आभार भाविन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहायक कार्यशाळा अधिक्षक वाय.एस.शिवदे, सहायक वाहतुक निरीक्षक नाना भामरे, वसंत गावीत, व्ही.एम.गावीत, डी.एस.अहिरे, राजु पारधी, भाईजी बावीस्कर, के.एस वळवी, कल्पना साबळे, यु.बी चौरे, कुसुम गावीत आदींनी कामकाज पाहिले.