नंबर वन गोलंदाज इम्रान ताहिर पुण्याच्या संघात

0

पुणे । आयपीएल 10 सुरवात होत आहे.या आयपीएलला सुरवात होण्यापुर्वी अनेक अडचणीचा सामना करावा लागतांना दिसत आहे. पुणे संघाचा गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने दुखापतीमुळे माघार घेतली होती.त्यामुळे पुण्यात संघात नविन गोलंदाजाला सहभागी करण्यात आले आहे.

आयसीसीच्या टि-20 आणि एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन असलेल्या द. आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला पुणे संघाने करारबद्ध केले आहे. रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत आहे. या संघाने दहाव्या सत्रात शार्दूल ठाकूर यापुर्वीच करारबद्ध करण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही पुणेसंघात
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती.त्यामुळे पुणे संघाने बदली खेळाडू म्हणून ताहिरला कारारबध्द केले.यापुर्वी मुंबईचा रणजी संघचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर घेतले आहे त्यानंतर इम्रान ताहिरला घेतले आहे.यामुळे पुण्यचा गोलंदाजीची बाजी भक्कम झाल्याचे दिसत आहे. इम्रान ताहिरला लिलावप्रक्रियेत कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. गेल्या वेळेस दिल्ली संघाचे नेतृत्व केले होते. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणार्‍या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील.

रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स संघ
आरपीएसचा संघ पुढीलप्रमाणे : महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, रविचंद्रन अश्विन, फाफ डू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, अ‍ॅडम जंपा, इम्रान ताहिर अंकित शर्मा, अंकुश बेन्स, अशोक डिंडा, बाबा अपराजित, बेन स्टोक्स, डॅनियल क्रिस्टियन, दीपक चाहर, ईश्वर पांडे, जसकरण सिंह, जयदेव उनाडकट, लोकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मिलिंद टंडन, राहुल अजय त्रिपाठी, राहुल चाहर, रजत भाटिया, सौरभ कुमार आणि उस्मान ख्वाजा.