नऊ महिन्यात नेता बना!

0

मुंबई । भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या रामभाऊ म्हाळगी या संस्थेने अडीच लाख रूपये फी आकारून 9 महिन्याचा एक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उत्कृष्ट नेता बनू शकत असल्याचा संस्थेने दावा केला आहे.

अभ्यासक्रमास प्रारंभ
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ‘इंडियन इन्सिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशीप’ या नावाने अभ्यासक्रम सुरू केला आहे. नुकताच या अभ्यासक्रमास प्रारंभ झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍यांना नेता होण्याबरोबरच राजकारण, प्रशासन आणि जनतेशी निगडीत प्रकरणांचे शिक्षण दिले जाणार आहे. 9 महिन्यांच्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये 32 लोकांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये एमबीए ते आयआयटी पास युवक आणि उद्योगपतींच्या मुलांचा समावेश आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्रातील असून त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगालसह मध्य प्रदेशातील विद्यार्थी नेता होण्यासाठी या संस्थेत प्रवेश घेतला आहे. ज्यांना राजकारणात ‘करिअर’ करायचे आहे, त्यांच्यासाठी हा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.