पिंपरी-चिंचवड : फुले दाम्पत्य सन्मान दिनानिमित्त महात्मा फुले जनशक्ती संघटनेच्या वतीने खान्देश माळी मंडळाचे सचिव नकुल रामराव महाजन यांना राज्यस्तरीय माळी समाजजीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरातून 18 लोकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
महाजन यांनी 19 वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक होत खान्देश माळी मंडळाची स्थापना केली आहे. तसेच त्यांनी भोसरी परिसरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था काढून गरजूंना मदत केली आहे. भोसरी, दिघी परिसरात सर्व खान्देशी बांधवासाठी खान्देश एकता मंडळाची स्थापना केलेली आहे. त्याद्वारे गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक उपक्रम ते राबवितात. त्यांना आदर्श कामगार नेता पुरस्कार ही यापूर्वी मिळालेला आहे. आताच जो समाज जीवनजीवन पुरस्कार मिळालेला आहे.