नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जाळपोळ

0

एटापल्ली: गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवाद्यानी पंतप्रधान सडक योजनेच्या कामाचे साहित्याची जाळपोळ केली असून यात लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री झाली. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात हि जाळपोळ करण्यात आली आहे.

जाळपोळ झालेल्या साहित्यामध्ये रोडरोलर, पाण्याचा टँकर, दोन मिक्सर मशीन आदी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी ज्या ठिकाणी हे साहित्य होते त्या ठिकणी येऊन आग लावली त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी सकाळी या घटनेचा पंचनामा केला आहे. या बाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.