नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट; वाहन उडविले

0

बीजापूर: छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडविला आहे. यात एक वाहन उडवले. ज्यामध्ये दोन नागरीक जखमी झाले. बीजापूर जिल्ह्याचे आयजी सुंदरराज यांनी बासागुडा आणि तर्रेम गावाच्यामध्ये राजपेंटा गावाजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी एक जीप भूसुरुंग स्फोटाद्वारे उडवली असल्याचे सांगितले.

या घटनेत वाहन मालक मोहम्मद इकबाल अन्सारी आणि मॅकानिक बलराम प्रधान हे जखमी झाले. या दोघांनाही बासागुडा येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.