रावेर। छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यातून मृत्यूशी झुंज देवून व साथीदारांना मृत्युच्या दारावरून खेचून आणत प्राण वाचविले. असा पराक्रम विवरे नगरीचा विर सुपुत्र केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचा जवान ईश्वर सोनवणे यांनी केला. हल्ल्यातून सुखरूप बचावल्याने सुटीवर आलेल्या ईश्वर सोनवणेचा विवरे बु. व विवरे खुर्द ग्रामसभेत गौरव करून सन्मान करण्यासाठी सर्व जातीधर्माचे नागरीक एकवटले होते. सत्कारानिमित्त गावाचा एकोपा व जातीय सलोखा पाहावयास मिळाला. याप्रसंगी त्याचा सत्कार सरपंच सुनिता सपकाळे, भाजपा सरचिटणिस वासुदेव नरवाडे, जनार्दन पाचपांडे यांचे हस्ते करण्यात आला.
वाल्याचा वाल्मीक होण्यासाठी संधी देऊ
छत्तीसगड नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जावू देणार नाही. देशविघातक कृत्य करणार्या नक्षलींचा बदला घेवू, त्यांना वाल्याचा वाल्मीक होण्यासाठी संधी देवू, तरीही ऐकले नाही तर त्यांना सोडणार नाही, असा नक्षलींना दम देत भावनाविवश होवून जवान ईश्वर सोनवणे याने मनोगत व्यक्त करून ग्रामसभेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ईश्वरच्या पराक्रमाची माहिती व वास्तव स्थिती माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी मनोगतातून मांडतांना तरुणांनी व्यसनमुक्त होवून पराक्रमी इश्वरचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. ग्रामसभेत पराक्रमी ईश्वर सोनवणे व राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धत देशातून तिसरा क्रमांक पटकावणार्या खेळाडू सोहम सचिन लढे यांचा सत्कार सरपंच सुनिता सपकाळे, माजी सरपंच वासुदेव नरवाडे, उपसरपंच संगिता राणे, विकासो चेअरमन जनार्दन पाचपांडे, मार्तंड भिरुड, माजी सरपंच आशा नरवाडे, धनजी लढे, निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम, शे. अमान, किरण पाचपांडे, बाबुराव पाटील, चतुर राणे, भागवत महाजन, विजय पुराणे, भारती गाढे, शे. बाबु, सुरेश सोनवणे, बिसन सपकाळे, निलीमा राणे, ग्रामविकास अधिकारी आर.एस. चौधरी यांसह ग्रामस्थांनी सत्कार केला. बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विवरे खुर्द ग्रामपंचायतकडूनही सत्कार सरपंच दिलीप पाटील यांचे हस्ते करण्यात आला.