सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत स्पेशल टास्क फोर्सचे 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेे.
जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दंतेवाडा येथे 7 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर बीजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. सुकमा जिल्ह्यातील कुकानर येथे 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याआधी एप्रिलमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते आणि 6 जवान जखमी झाले होते.