नगर : 900 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अहमदनगरमधील ज्ञानेश्वरी मल्टी स्टेट अर्बन सहकारी पतपेढी आयकर विभागाच्या रडारवर आहे. फेब्रुवारी 2015 ते मार्च 2017 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असून यात कर बुडवण्यात आल्याचा संशय आहे. ही पतपेढी 2013 मध्ये सुरू केली आहे. मुंबई आणि इंदौर शहरांमध्येही शाखा आहेत. गेल्या दोन वर्षात 58 जणांचा खात्यांमध्ये पैसे जमा झाले; पण ही खाती बोगस असावी असा दाट संशय आहे.