नगरदेवळा गावातील विवाहितेचा तीन लाखांसाठी छळ

पाचोरा : नगरदेवळा येथील माहेर व उपलखेडा, ता.सोयगाव येथील विवावहितेचा माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सात जणांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नानंतर छळाला सुरूवात
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील असना परविन हिचा विवाह उपलखेडा ता. सोयगाव, जि.औरंगाबाद येथील असीफ अली लियाकत अली यांचेशी झाला होता. लग्नानंतरच सासरच्या मंडळींकडुन माहेरहुन तीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी असना परवीन हिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर असना परवीन असीफ अली सैय्यद हिने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत पती आसीफ अली लियाकत अली, सासरे लियाकत अली भिकन अली, सासू सलमाबी लियाकत अली, दीर शराफत अली लियाकत अली (सर्व रा.उपलखेडा, ता.सोयगाव), नणंद साजेराबी शेख जऊावेद, जावेद शेख मुस्ताक (रा.रतनजी नगर, जंगलशहा बाबा दर्गा, गल्ली नं. 1, घर क्रं. 11, सुरत, गुजरात), शाहिस्ताबी अलीन शेख (रा.शिंदाड, ता.पाचोरा) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे करीत आहे.