नगरदेवळा/पाळधी । येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या वार्ड.क्र. 4 च्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संदीप अशोक पाटील व त्र्यंबक गरबड शिरूडे रिंगनात होते. सकाळी 7.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदानाला सुरवात झाली परंतु पाच मतदान झाल्यानंतर ऐनवेळी मतदान यंत्रात झालेल्या बिघाडामुळे थोड्या वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली परंतु एक तासाच्या आत नवीन मतदान यंत्र शासनाने उपलब्ध करत गोंधळ सावरला परंतु याचा परीणाम थेट मतदानावर झालेला दिसला.
मतदान काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त
सकाळच्या सत्रात मजूर वर्ग मतदान करण्यास आले असता त्यांना परत जावे लागले. दिवसभर मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. एकूण 2238 पैकी 880 म्हणजे 39.32 टक्के मतदान झाल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी आय. बि. देशमुख यांनी दिली. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए.एम.राठोड, तलाठी के.डी.बहिर यांनी काम बघितले. निवडणुकीवेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशि यांनी निवडणुक केंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी सहाय्यक फौज.प्रकाश पाटील , गणेश मराठे पोलिस नाईक विनोद पाटील, विजय महाजन,जिजाबराव पवार पो.कॉ.नरेंद्र विसपुते राजेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पाळधी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुक शांततेत
पाळधी । येथील लोकनियुक्त सरपंच व दोन सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. उर्वरित 15 सदस्य बिनविरोध निवडल्याने फक्त सरपंच व दोन सदस्यांसाठी आज मतदान घेण्यात आले. लोकनियुक्त सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला राखीव असल्याने चार उमेदवार सरपंचपदासाठी लढत होते. पाळधी बुद्रुक ग्रामपंचायतचे एकुण मतदार 6175 असून त्यापैकी 4554 मतदार असे 73 टक्के मतदारा आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनचे मतदारांनी रांगा लावल्या होत्या. धरणगाव पोलिस निरीक्षक बाळू सोनवणे, पाळधी सपोनि जगदीश मोरे, पो.कॉ.राजेंद्र पाटील, अमोल सुर्यवंशी, दिपक माळी, पंकज पाटील यांच्यासह इतर पोलिस कर्मचार्यांची उपस्थिती होती.
मतदानासाठी सकाळपासूनच रांगा
एरंडोल । तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 75 टक्के मतदान झाले. किरकोळ वादविवाद वगळता मतदान शांततेत पार पाडले. खडके बु.येथे 1600 पैकी 1226 मतदारांनी,खेडगाव येथे 1160 पैकी 861 ,वरखेडी येथे 776 पैकी 603,वनकोठे येथे 2771 पैकी 1935 तर भालगाव येथे 646 पैकी 548 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकुण 6953 पैकी 5173 म्हणजेच 74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती नायब तहसिलदार आबा महाजन यांनी दिली. किरकोळ वाद वगळता निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.