नगरदेवळा येथील जवानाचा हृदय विकाराने मृत्यु

0

नगरदेवळा । येथील भारतीय सैन्य दलाच्या सेवेत असलेला सावता सखाराम रोकडे यांचा रविवारी 6 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

गोबा महाजन यांचे ते द्वितीय चिरंजीव होते. अहमदनगर येथे त्याचा मृत्यु झाला आहे. ते 42 वर्षांचे होते. भारतीय सैन्यदलात ते नायक पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्युची बातमी कळताच नगरदेवळा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी 9.00 वा. शासकीय इतमामात राहत्या घरापासून निघणार आहे.