नगरदेवळा । येथील मंडळ अधिकारी पी.पी.राजपूत तसेच चुंचाळे व पिंपळगाव तलाठी हे सतत कार्यालयात गैरहजर रहात असून ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने नगरदेवळाचे सरपंच सुनंदा पाटील यांनी तशी लेखी तक्रार तहसीलदार बी.ए.कापसे यांचेकडे केली आहे.
नगरदेवळा हे जवळजवळ तीस हजार लोकवस्तीचे गाव असून याला लागून जवळपास बावीस खेड्याचा परिसर आहे. त्यामुळे ग्रामस्थ, नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी यांना विविध कारणांसाठी दाखले, उतारे लगत असतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून येथील मंडळ अधिकारी तसेच चुंचाळे व पिंपळगाव तलाठी येत नसल्याने नागरीक विनाकारण कार्यालयात येवून जातात. शेतकरी शेती सोडून तर विद्यार्थी शाळा सोडून दाखले घेण्यासाठी येत आहे. बर्याच कामात दिरंगाई होत असून ऑनलाइनच्या नावाखाली काहीही कारणे सांगून लोकांना वेठीस धरले जात असून हा प्रकार भरपुर दिवसांपासून सुरू आहे. तरी तहसीलदार यांनी या प्रकरणी लक्ष पुरवून स्थानिक व खेड्यावरील येणार्या लोकांचा त्रास दूर करण्याची मागणी सरपंचा सुनंदा पाटील यांनी केली आहे. तशी लेखी तक्रार त्यानी तहसीलदार यांचेकडे पाठविली आहे.