नगरदेवळा येथे संभाजी महाराजांना अभिवादन

0

नगरदेवळा। येथील शाहीर परिषदेच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जळगाव शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी संभाजी महराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

तसेच संभाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा माहिती त्यांनी यावेळी दिली. बाल शाहिरांनी यावेळी संभाजी महाराजांवरील पोवाड्याचे सादरीकरण केले.यावेळी सुदाम पाटील ,गो.शि.म्हसकर, समाधान पाटील ,उमेश पाटील, कुणाल राऊळ ,उमेश पाटील उपस्थित होते.