नगरदेवळा रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळील मद्यविक्रीवर भडगाव पोलिसांचा छापा

0

भडगाव । नगरदेवळा स्टेशनजवळील उड्डाणपुलाजवळ असलेल्या आनंद गार्डनवर रात्री साडेआठवाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी छापा टाकुन 9 हजार 395 रुपयाची विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या असून यात कुणाल माळी याच्यावर कारवाही करण्यात आली आहे. या कारवाईने तालुक्यात मद्य व्यापारीमध्ये घबराहट पसारली असून छुप्या मार्गाने होणारी विक्री सुरूच असुन शहरातील अन्य ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत असुन कार्यवाही पोलिसाकडून केली पाहीजे असे सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

न्यायालयीन बंदी असल्यावरही दारू विक्री
न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासुन पाचशे मीटरपर्यत मद्य विक्री करण्यास बंदी आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत चाळीसगाव रस्त्यावरील नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळील आनंद गार्डन या हॉटेलवर मद्य विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलिस स्टेशनचे पोनि दत्तात्रेय परदेशी यांना मिळाली. त्यानुसार 24 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोनि परदेशी याच्यां नेतृत्वाखाली पथकाने अचानक हॉटालवर छापा टाकला. त्यात विविध प्रकारच्या साधरण नऊ हजार रूपये कींमतीचे मद्य आढळुन आला. पोलिसांनी या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. पथकात सहाय्यक फौजदार राजेंद्र निकुंभ, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, राजेंद्र साळुंखे, पोकॉयोगेश पाटील, लक्ष्मण पाटील, अमोल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, हरीष अहीरे, विश्वास देशमुख यांचा
समावेश होता.