बोदवड : शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये मंजूर दोन करोड 40 लाख रुपयांच्या स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामावरुन नगरसेवकांत संघर्ष निर्माण होऊन वाद निर्माण झाला होता. या वादातून राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांनी मुख्याधिकार्यांच्या दालनातील प्रवेशद्वाराच्या काचेची तोडफोड केली होती. या प्रकरणी मुख्याधिकारी. चंद्रकांत भोसले यांनी उपस्थित नगरसेवकांना नोटीस बजावली होती. सदरील नोटीसचे असमाधानकारक उत्तर आल्याने नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 427 नुसार आगळिक करणे आणि त्याद्वारे 50 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.