नगरपंचायत निकाल 16 ऐवजी 20 ला

0

पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार वडगाव कातवी नगरपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीची तारीख 16 जुलै वरून 20 जुलै केली आहे. त्यामुळे वडगावकारांना आपला नवीन नगराध्यक्ष समजण्यासाठी मतदानानंतर चार दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नगरपंचायतीची निवडणूक 15 जुलै रोजी होणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेची निवडणूक 19 जुलै रोजी होणार आहे. वडगाव कातवी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाचा परिणाम वानाडोंगरी नगरपरिषदेच्या निकालावर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली असून वडगाव कातवी नगरपंचायत निकालाची तारीख पुढे ढकलली आहे.