नगरपंचायत निवडणुकीच्या 145 पैकी 41 अर्ज छाननीनंतर बाद

0

शिदखेडा । ननगर पंचायत निवडणूकीत दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी चाळीस असे एकूण 41 अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यांतील बहूसंख्य अर्ज पक्षाचे जोडपत्र व पात्र सूचक नसल्याने नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच अनेक उमेदवारांनी डमी अर्ज दाखल केल्याने असे अर्ज नामंजूर झाले आहेत. 156 अर्जांपैकी छाननी अंती 41 अर्ज बाद झाले. नगराध्यक्ष पदासाठी सेनेकडून माळी ललिता दिनेश यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतू पक्षाच्या अधिकृत जोडपत्र न सादर केल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला. प्रभाग 3 मध्ये समाजवादी पार्टीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार निलिमा राधेश्याम पाटोळे यांनी अर्जामध्ये योग्य सूचक न दिल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामूळे या प्रभागात समाजवादी पार्टीचा अधिकृत उमेदवार नाही.

आरक्षणनिहाय नामंजूर अर्ज
नगरसेवक पदासाठी 40 अर्ज नामंजूर करण्यात आले. यांत अर्ज बाद झालेल्या बहूसंख्य उमेदवारांनी डमी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज मंजूर असून नगरसेवक पदासाठी 85 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. आरक्षण निहाय नामंजूर अर्जांची संख्या अनुसूचित जाती (1), अनूसूचित जमाती (1), अनूसूचित जमाती महिला (3), नागरीककांचा मागास प्रवर्ग(3), अनूसूचित जमाती महिला (3), सर्वसाधारण (12), सर्वसाधारण महिला (8), नागरीकांचा मागास प्रवर्ग (5), नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला(4) अशी आहे.

146 उमेदवारी अर्ज
नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवक निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेसह समाजवादी पक्षाने शक्तिप्रदर्शन केले. तर नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व समाजवादी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चौरंगी लढत अटळ ठरणार आहे. याशिवाय 17 प्रभागांसाठी नगरसेवक निवडून द्यावयाचे असल्याने या चारही राजकीय पक्षांसह अपक्ष मिळून तब्बल 146 उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत.

चौरंगी लढत
नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे शिंदखेडा येथील गटनेते अनिल वानखेडे यांच्या पत्नी रजनी अनिल वानखेडे, काँगे्रस-रा.काँगे्रसच्या वतीने विद्यमान उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख यांच्या मातोश्री मालतीबाई देशमुख यांनी तर शिवसेनेतर्फे लताबाई रमेश माळी आणि समाजवादी पक्षाकडून बिसमिल्लाबी गुलाम खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी या चारही राजकीय पक्षांसह बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनीही अर्ज भरल्याने त्याठिकाणी मात्र बहुरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.