नगरपालिका उर्दू शाळेत बालआनंद मेळावा

0

भुसावळ। नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये बालआनंद मेळावा साजरा करण्यात आला. उद्घाटन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डी.टी. ठाकुर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हमिद शेख उपस्थित होते. सोबत प्रमुख अतिथी म्हणून शेख अजिज, अख्तर, हनिफ गार्ड, डॉ. ख्वाजा, जव्वाद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जहिरुद्दीन शेख, राजू चौधरी, शबाना गवळी, बिस्मिल्ला खान, उपशिक्षक असलम खान, तारिक रजा, मुसा खान, जाफर खान, रजियाबाजी, अशरफ खान, शहनाज, फिरोज जमाल, सै. सादिक, शेख इरफान उपस्थित होते.

या मेळाव्यात विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना विक्रीचा अनुभव येण्याच्या दृष्टीने यावेळी विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थांची विक्री केली. मुख्याध्यापक हमिद शेख यांच्या हस्ते चविष्ट पदार्थ, अधिक विक्री व उत्तम सजावट करणार्‍या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.