नगरपालिका निवडणुकीत वैयक्तिक भेटींवर भर

0

नवापूर ऩगर पालिकेची रणधुमाळी सुरु झाली तसे वारे गतीने वाहु लागले असुन होम टु होम प्रचार दहा प्रभागात सुरु आहे वैयक्तिक भेटीवर जास्त भर दिला जात आहे. विविध राजकीय पक्षाचे बँनर घेऊन प्रचार फेरी सुरु आहे प्रभागातील उमेदवारांनी पहिल्या व दुसर्या फेरीत प्रचार फेरी काढुन मतदारांशी संपर्क करण्यात येत आहे. सरदार चौक येथे भाजपा सेना युतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योती जयस्वाल यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन डाँ हिना गावीत यांनी आ डाँ विजयकुमार गावीत यांचा उपस्थित नुकतेच केले आहे. सर्वच प्रभागात लहान मुल व महिला तसेच युवकांची फौज कार्य करत आहे. पाच वर्षात ज्यांनी त्या प्रभात तोंड नाही दाखवले ते जनसेवक पुन्हा प्रचार फेरीत दिसुन येत आहे काहींना काही ठिकाणी मतदरांचे खडे बोल ऐकावे लागत आहे काहींना तिकिट न मिळाल्याने ते अपक्ष उमेदवारी करत आहे. ते अडचणीचे ठरु नये म्हणुन पक्षाचे नेते त्यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे दि 30 रोजी माघारीची तारीख असुन कोणता उमेदवार माघार घेईल ते दिसुन येणार त्या नंतरच किती उमेदवार रिंगणात आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे.

तिकिट न मिळाल्याने नाराज गटांचा हालचालींना थोपविण्याचे प्रयत्न सुरु आहे काही मान गये तर काहींन मध्ये विश्‍वासघाताचा दुख अजुन आहे. ते खतरे की घंटी असुन त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही सबका साथ तभी जय हो हे धरुन चालावे लागेल नाही तर गयी भैस पाणी में याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही.आम्ही पक्षासाठी काम करत आलो व आता दोन तीन महिन्या पुर्वी आलेल्यांना पक्षाने तिकिट दिल्याचे ओरड कार्यकर्त करत आहे तोंड पाहुन व जवळकी असलेल्यांना तिकीट दिली असे ही बोलले जात आहे. राजकीय पक्ष कार्यालया कडुन विविध पक्षांचे झेंडे,बँनर,दुपट्टा,टि शर्ट आदि वस्तु कार्यकर्त्याना मिळाल्या असुन त्याचा वापर प्रचाराचा वेळी केला जात आहे तसेच रिक्षा व मोटार सायकलीवर पक्षाचे झेंडे लावुन ते प्रभागात फिरतांना दिसत आहे व आपल्या उमेदवाराचा प्रचार करुन वातावरण निर्मीती करत आहे. सर्वसाधारण पणे सकाळी आठ ते दहा व सांयकाळी उशिरा पर्यत सामुहीक भेटीवर भर दिला जात आहे तर काही ठिकाणी महिला व पुरुष गटागटाने मतदरांना भेटत आहे. प्रचार कार्यालये सुरु होत आहे काही प्रभाग लहान तर काही मोठे असल्याने काहींना खुपच फिरावे लागत आहे. तर काही प्रभागात मतदारांना जेवण दिले जात आहे तर काही ठिकाणी ओल्या पार्टा रंगत आहेत रात्री उशिरा पर्यत मतदार भेटी होतांना दिसत आहे प्रचार फेर्यानी शहर दणाणुन जात आहे. उमेदवार हात जोडुन पाय पडुन व कार्यकर्त घोषणा देत प्रचार फेरी सुरु आहेत. मतदार यांद्याचा अभ्यास करुन त्या नुसार प्रचार नियोजन करण्यात येत असुन सोशल मिडीयावर उमेदवारांचा पोष्टचा भडीमार करुन प्रचारात आघाडी साधण्याची शर्त सुरु आहे माघारी अंती चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवार वेगाने प्रचार कार्यात व्यस्त होतील त्यानंतर लाईट बाजार,सरदार चौक येथील सभा गाजणार असुन काँनर सभेत प्रचाराचे कोणते प्रश्‍न व आरोप प्रत्यारोप यांचा कोणता शब्द बाँम गोळा टाकला जातो हे पाहायला मिळेल तुर्त एवढेच..पुन्हा भेटुच…

– हेमंत पाटील, नवापूर
9823610627