नगरपालिका रूग्णालयात पावती न देता शुल्क आकारणी

0

शहादा । सर्वसामान्यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने ते नगरपालिकेच्या रूग्णालयात येवून उपचार घेत असतात. परंतु, या गोर गरीब रूग्णांची नगरपालिकेच्या रूग्णालयात अवाजवी पैसे घेवून त्यांची आर्थिम फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार भारती जनता पक्षाकडे करण्यात आली होती. यानुसार भारतीय जनता पक्षांचे पदाधिकारी हे नगरपालिका रूग्णालयात गेले असता त्यांना रूग्णांकडून रक्त तपासणी, एक्स-रे शुल्काच्या नावाखाली 60 रूपये पावती न देता घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. गरीब रूग्णांची आर्थिक लुट केली जात असल्याने पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला.

पदाधिकार्‍यांकडून रेकॉर्डबुकची तपासणी
रुग्णांकडुन रक्त तपासणी व एक्स रे साठी 60 रुपये कुठलीच पावती न देता घेतली जातात असल्याचे त्यांना आढळले. जमदाळे यांनी अनागोंदी कारभार पाहून ओ.एस.सावरे यांना घटनास्थळी बोलवून घेतले. रेकॉर्ड बुकची तपासणी केली असता शुल्क पावती बुक नसल्याने दिसले. त्यांनी ओ.एस. सावरे यांची चौकशी केली असता त्वरीत शुल्क पावती बुक उपलब्ध करुन दिले जाईल असे अश्वासन सावरे यांना दिले. यावेळी मनोज वाडिले, विनोद जैन, गणेश मराठे, महामंत्री हितेंद्र वर्मा, निलेश मराठे, भरत कुंभार आदी उपस्थित होते.