शहादा । नगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद नगरला लागून असलेल्या नाल्यातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातून गेलेल्या नाल्यातील गाळ घाणीमुळे पावसाळ्याचे पाणी त्यात जावून सर्व घाण नवीन वसाहतीत जात असल्याने त्यापासून रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येत होते. शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पावसाळ्यापूर्वीच नाले व गटार स्वच्छता सुरु केली आहे.
शहरातील इतर भागातही नाले, गटारी करणार साफ
शहरातील प्रकाशा रोड लगत साईबाबा मंदिरास लागून गेलेल्या पाटचारीतील घाण जेसीबी च्या साह्याने काढण्याचे कामास प्रारंभ झाला आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, जि.प. सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे यांनी उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतले. शहरातील विविध भागात अश्या प्रकारची नाले व गटारी सफाई चे काम हाती घेवून शहरातील दुर्गंधी दूर करण्याचा उपक्रम नगरपालिकेने हाती घेतला आहे.