भुसावळ। पालिकेच्या जीर्ण इमारतीवरून राजकारण पेटले असतानाच दोन दिवसांपूर्वी सत्ताधार्यांना स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्टमध्ये इमारतीची जागा धोक्याचीच असल्याचा मिळाल्याने पालिका इमारत स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
दोन जागांचा पर्याय
ते म्हणाले की, पालिकेतील विविध विभागांचे एकाच ठिकाणी सुरू करता येतील इतकी प्रशस्त जागा नाही मात्र आम्ही जळगाव रोडवरील शाळा क्रमांक एक तसेच सांस्कृतिक हॉलची पाहणी केली आहे. तेथे पालिका इमारत स्थलांतराचा विचार सुरू आहे. एकाच ठिकाणी पालिकेचे कामकाज सुरू करायचे की दोन ठिकाणी सुरू करायचे याचा निर्णय कर्मचार्यांशी चर्चा करून लवकरच घेतला जाणार आहे. स्ट्रॅक्चरल ऑडीटमध्ये पालिकेची इमारत जीर्ण असल्याचा स्पष्ट अहवाल मिळाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही इमारत जीर्ण असलीतरी पालिकेत बसून कामकाज करीत आहोत मात्र लवकरच स्थलांतराचा प्रश्न सुटणार आहे.