नगरपालिकेच्या प्रभाग नऊ असाठी 27 रोजी मतदान

0
आज होणार मतदार यादी प्रसिद्ध होणार 
आळंदी : आळंदी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ अ या अनुसूचित जाती संवर्गा साठी राखीव रिक्त जागेसाठी आळंदीत 27 जानेवारी 2019 ला पोटनिवडणू होणार आहे. 27 रोजी मतदान व 28 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठीची मतदार यादी शनिवारी (दि.29 डिसेंबर रोजी) प्रसिद्ध होत असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. आळंदी नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 9 काळे कॉलनी या प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये आहे. या प्रभागासाठी अंतिम मतदार यादी 29 डिसेंबरला प्रसिद्ध होत आहे. 29 डिसेंबर ला निवडणूक कार्यक्रम टप्पा सुरु होत आहे. यासाठी पुणे जिल्हाधिकारी अधिसूचना जाहीर करतील. 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत उमेदवारी भरण्याचा व स्वीकारण्याचा कालावधी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची वेबसाईट उपलद्ध होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत कामकाज करता येईल.
अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम
मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले की, 6 जानेवारीला रविवार सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत. 10 जानेवारीला अर्जाची छाननी व वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अपील नसल्यास 17 जानेवारी दुपारी तीनवाजेपर्यंत अर्ज माघारी अंतिम मुदत रहाणार आहे. माघारीचे मुदतीनंतर एक जागा असल्याने एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास चिन्ह वाटप, 27 जानेवारीला पोटनिवडणुकीसाठी आवश्यकता असल्यास मतदान होणार आहे. 28 जानेवारीला दहा वाजता मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी सूचनादेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार आळंदीत अंतिम मतदार यादी तयार करण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादीत 910 महिला, 1121 पुरुष एकूण 2031 मतदार आहेत. अंतिम मतदार यादी 29 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.