नगरपालिकेच्या योजना गरजुपर्यंत पोहोचणार

0

रावेर पालिकेची नूतन मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांची ग्वाही

रावेर (प्रतिनिधी)- रावेर नगर पालिकेची हद्दवाढ करणार असून स्वच्छ सर्वेक्षणाला गती देण्यासह शहरातील गजरूंना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येईल व कर्मचारी संख्याबळ वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाणार असल्याची ग्वाही नूतन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. सुमारे वर्ष भरापासुन असणारे प्रभारीराज आता संपुष्टात आले असून लांडे यांची बदली झाल्यानंतर सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांचे पालिकेतील लोकप्रतिनिधींसह कर्मचार्‍यांनी स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन नगरपालिका कामकाजाचा आढावा घेतला.

बांधकाम अभियंता मिळेना
रावेर नगरपालिका कार्यालयात सध्या 14 कर्मचारी असून बांधकाम अभियंता, लेखापाल यासारख्या संर्वगातील कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. पालिकेचा कारभार गतिमान करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने शासनाकेडे कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे लांडे म्हणाले.