भुसावळ । पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्यांना गेल्या 20 वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालेली नव्हती त्यांना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते सोमवार 10 रोजी नगराध्यक्ष दालनात 100 टक्के लाभाचे धनादेश वितरीत करण्यात आले.
51 लाख रक्कमेचे धनादेश वितरण
पालिकेत आजपर्यंत एकही सेवानिवृत्त कर्मचार्यांना मिळाला नव्हता काही दलालाच्या मार्फत टक्केवारीची भाषा करुन कर्मचार्यांकडून पैसे लुबाडण्याचे काम तसेच अर्ध्या रक्कमेचा चेक देण्याचे काम दलालांमार्फत केले जात होते. 2 ते 3 वर्षे सेवानिवृत्त झाल्यानंतरही लाभाची रक्कम मिळत नव्हती. मात्र नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रयत्नाने 11 सेवानिवृत्त कर्मचार्यांना 51 लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेविका सोनी बारसे, नगरसेवक बोधराज चौधरी, मुकेश पाटील, राजेंद्र नाटकर, युनियन अध्यक्ष राजू खरारे, अर्जुन खरारे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अख्तर खान व लेखपाल दिनेश उपस्थित होतेे. नगराध्यक्ष रमण भोळे कर्मचार्यांशी संवाद साधताना सांगितले की, मागील सत्ताधार्यांनी जे काही केले त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही, जोपर्यंत भाजपाची सत्ता आहे. तोपर्यंत कर्मचार्यांना 100 टक्के सेवानिवृत्तीच्या पैशांचा लाभ देऊ व वेळेत कर्मचार्यांच्या वेतन देऊ कुणीही तुमच्या कष्टाच्या पैशांमध्ये टक्केवारी मागत असेल तर त्यांच्यावर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचेही भोळे यांनी सांगितले.