नगरमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची होणार हकालपट्टी?

0

अहमदनगर: महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाला न कळविता परस्पर भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वत: याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचे महापौर व उपमहापौर झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा संदेश समाजात गेला होता. या प्रतिमेमुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.