नगररचनाकार डी.एच.सोनवणे रुजू

0

जालना येथील एस.ए.पवार यांच्याकडे सहाय्यक संचालकपदाचा पदभ

जळगाव: मनपाचे नगररचनाकार अनंत धामणे हे दि.31 डिसेंबर 2019 रोजी सेवानिवृत्त झाले.त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी नगररचनाकार डी.एच.सोनवणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोवविण्यात आला असून ते बुधवारी मनपात रुजू झाले.यावेळी नगररचना विभागातील अभियंत्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मनपाचे सहाय्यक संचालक नगररचना पदी जालना येथील एस.ए.पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते देखील लवकरच रुजू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर मनपाला नगररचनाकार आणि सहाय्यक संचालक नगररचना हे दोन अधिकारी मिळाले आहेत.

मनपाचे नगररचनाकार अनंत धामणे यांच्याकडे मनपासह सहाय्यक संचालक नगररचनाकार ,जळगाव येथील कार्यालयाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. धामणे हे दि.31 डिसेंबर 2019 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मनपात त्यांच्याजागी नगररचनाकार म्हणून डी.एच.सोनवणे यांची तर सहाय्यक संचालक नगररचना पदी जालना येथील एस.ए.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सहाय्यक संचालक नगररचनाकार ,शाखा जळगाव येथील विभागात नंदुरबार येथील डी.डी.वराडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान,मनपात नगररचनाकार म्हणून डी.एच.सोनवणे रुजू झाले आहेत.यावेळी त्यांनी नगररचना विभागातील अभियंत्यांची बैठक घेवून आढावा घेतला.