जळगाव । नगररचना विभागातील भोंगळ कारभारावर प्रकाश टाकत सर्वसामन्यांची नगररचना विभागात काम होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी शुक्रवारी आयोजित महासभेत केला. यावेळी व्यापसपीठांवर महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते.
भूखंड आरक्षणात संगनमत
शहरातील भूखंडावरील आरक्षण संगनमताने रद्द करण्यात येत असल्याचा आरोप श्री. रविंद्र पाटील यांनी केला. अशा व्यवहारांत करोडो रूपयांचे सेटलमेंट होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यासंदर्भांतील केस लढविण्यासाठी महापालिकेने चांगला वकील नेमावा अशी सूचना मांडली. जेव्हा कोणतेही काम करयाचे नसते तेव्हा अधिकार्यांमार्फेत नियम दाखविण्यात येत असल्याचे श्री. रविंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापौर ललित कोल्हे यांनी आयुक्त यावर योग्य ती कारवाई करतील असे सांगितले.
गाळेधारकांच्या प्रश्नांवर भाजपा-खाविआत तु-तु मै-मै
महासभेपूर्वी मनपा व्यापारी गाळेधारक संघटनेच्या शिष्टमंडळांनी महापौरांना निवेदन दिले. नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी गाळेधारकांबाबत आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थितीपर माहिती देवून मार्ग काढण्याबाबत सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त करताच बंटी जोशी यांनी पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी, रविंद्र पाटील यांना उद्देशून केंद्रात आणि राज्यात तुमचेच भाजपचे सरकार आहे. तुम्ही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न का करीत नाही? असे म्हणताच बंटी जोशी आणि पृथ्वीराज सोनवणे यांच्यात खडाजंगी झाली. दोघांची शाब्दीक चकमक सुरु असतांना सुनिल महाजन, जितेंद्र मुंदडा, अमर जैन, नितीन लढ्ढा यांनीही चर्चेत सहभागी होवून खाविआची भुमिका गाळेधारकांची हिताचीच आहे. राज्यात तुमची सत्ता आहे तर तुम्ही मार्ग का काढत नाही? असा सवाल उपस्थित केल्यानंतर भाजप आणि खाविआच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान महापौर ललित कोल्हे यांनी गाळेधारकांच्या प्रश्नांसाठी विशेष सभा बोलविण्यात येणार असल्याचे सांगत वादावर पडदा पाडला.
समांतर रस्त्यांचा डिपीआर मंजूर
समांतर रस्त्यांचा प्रश्न चर्चाला आल्यावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पूर्वींचा 400 कोटींचा डिपीआर हा ना. नितीन गडकरी ंयांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला. यात तरसोद ते पाळधीपर्यंतच्या रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांसोबत केली असल्याची माहिती दिली. हा बायपास तयार होणार असल्याने शहरात वाहतूक जवळपास 40 टक्के होणार आहे. कालिंकामाता मंदिर ते खोटेनगर समांतर रस्ताचा डीपीआर 122 कोटींचा तयार करण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनी 125 कोटींच्या डिपीआरला मान्यता दिल्राचे सांगितले. मात्र, समांतर रस्ते विकासीत करतांना ही जागा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरीत करण्याचा ठराव करण्यात आला. कालंकीमाता मंदिर ते खोटेनगर समांतर रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण केल्यानंतर महापालिकडे पुन्हा हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
मागणी करूनही कार्यवाही नाही
नगरसेवक रविंद्र पाटील यांनी सहाय्यक नगररचनाकार भागवत पाटील यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. नगररचना विभागात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. पैसे दिल्याशिवाय नागरिकांचे काम होत नाही. यातच एक तक्रार आली असून तत्कालीन नगरपालिका सदस्या शकुंतला खडके यांच्या जमीन हडप करण्याचा प्रकार समोर आला असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच नगररचनातील अधिकार्यांविरुध्द अनेक तक्रारी असून अनेकदा मागणी करूनही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकार्यांनावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक श्री. पाटील यांनी केली.
3 दिवसांत टिडीआर द्या
नगररचना विभागातील अधिकार्यांच्या कामाबाबत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी देखील प्रश्न उपस्थित केला. बांधकाम नियमीत करण्याच्या प्रक्रीयेबाबत नगररचनामधून माहिती दिली जात नसल्याचे नगरसेवक जोशी यांनी सांगितले. यासाठी एक अभियंत्याची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना श्री. जोशी मांडली. सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी 3 दिवसांत टिडीआर देण्यात यावा अशी सूचना मांडत आरक्षण प्रकरणांना प्रसिध्द द्यावी असे सांगितले. याला उत्तर देतांना प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी अशी सर्व प्रकरणे एसीबीकडे पाठविण्यात येतील असे जाहीर केले.