नगररचना विभागात सुसूत्रता आणण्यासाठी महापौरांचा पुढाकार

0

जळगाव । महापालिकेच्या नगररचना विभागात सुसूत्रता आणून नागरिकांना सुविधा देण्याचे आदेश महापौर ललित कोल्हे यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले आहेत. महापालिकेतील काही मोजक्या विभागांशी नागरिकांचा थेट संबंध येत असतो त्यात नगररचना विभागाचा अग्रक्रम लागत असतो. या विभागात नागरिकांना बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, विकास हस्तांतरण हक्का अशा परवानगी तसेच प्रमाणपत्रांसाठी यावे लागते.

मुदतीत प्रकरणे न झाल्यास कारवाई
याकामांवेळी नागरिकांना नगररचना विभागात कटू अनुभवाला सामोरे जावे लागते. या कटू अनुभवानंतर नागरिकांमध्ये महापालिकेविषय रोष उत्पन्न होवून नाराजी व्यक्त केली जाते. नागरिकांना येणार्‍या कटू अनुभवाकडे बघता महापौर कोल्हे यांनी नगररचना विभागाला सक्त सूचना केल्या आहेत. यात महापौर कोल्हे यांनी 300 मिटर पर्यंतच्या बांधकाम परवानग्या 30 दिवसांचे आंत देणे बंधनकारक केलेले असून विहीत केलेल्या मुदतीत प्रकरणे निकाली न झाल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. तसेच विहीत कालमर्यादेत नगररचना संबंधीत प्रकरणे निकाली काढणेबाबत वेळोवेळी आढावा घेवून कर्तव्यांत कसुर करणार्‍यांवर कठोर कार्यवाही करणार.