नगरविकास मंत्री शिंदेंनी महापालिकेची भेट टाळली
हुडकोच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा लटकला ; बंडखोरांना ‘उल्लू बनाविंग’
जळगाव – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पहिलाच जिल्हा दौरा होता. या दौर्यात ते महापालिकेला भेट देतील अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने महापालिकेत शिंदेंच्या स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेची भेट टाळत थेट पाचोराकडे प्रयाण केले. शहर आणि महापालिका शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी भेट टाळल्याची महापालिकेत जोरदार चर्चा रंगली होती.