नगरसेवकांच्या नामफलकाचा प्रस्ताव तहकूब

0

पिंपरी : शहरात सन्मानियांचे लागलेले नामफलक कमी करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी धोरण तयार केले होते. विद्यमान आणि माजी नगरसेवकांच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेला एकच नामफलक लावला जाणार होता. मागील निवडणुकीतील माजी नगरसेवकांचाच नामफलक लावला जाणार होता. तसेच फलकाचा रंग हिरवा, त्यावरील मजकूर पांढर्‍या अक्षरांत असावा, असे धोरण तयार केले होते. परंतु, यावर कोणतीही चर्चा न करता सत्ताधार्‍यांनी हा प्रस्ताव तहकूब ठेवला. त्यामुळे नामफलकाच्या धोरणावर महिनाभर तरी पाणी पडले आहे.

फलकांसाठी नियमावली
विद्यमान आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा नावाचा त्यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या कडेला एकच फलक लावण्यात यावा. लगतच्या मागील निवडणुकीतीलच माजी नगरसेवकाचा नामफलक लावावा. फलक तीन फुट आणि 2 फुट आकाराचा असवा. त्याची जमिनीपासून उंची सात फुट असावी. फलक हिरव्या फ्लोरोसंट रंगामध्ये (बॅकग्राऊंड) असावा. तसेच त्याच्यावरील मजकूर पांढ-या अक्षरांत मराठीमध्ये लिहिवा. नावाच्या अक्षरांची उंची 10 सेंटी मीटर व इतर मजकुरांच्या अक्षरांची उंची सात सेमी इतकी असणार होती, असे धोरण पालिका प्रशासनाने तयार केले होते. परंतु, या प्रस्तावावर कोणतेही चर्चा न करता सत्ताधा-यांनी हा प्रस्ताव तहकूब ठेवला.