नगरसेवकाने केले हॉटमिक्स रस्त्यांचे भूमिपूजन

0

तळोदा। शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये येणार्‍या खान्देशी गल्लीत रस्त्यांचे कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या परिसरात रस्ता अनुदान निधीतून 10 लाखाचे हॉटमिक्स रस्ते तयार केले जाणार आहेत.

या कामांचे भूमिपूजन पालिकेचे नगरसेवक संजय माळी, आरोग्य सभापती गौरव वाणी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंकज राणे, सतीवन पाडवी, प्रकाश ठाकरे, बच्छुसिंग परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, हिरालाल माळी, प्रकाश कर्णकार, विलास कर्णकार, भूषण कर्णकार उपस्थित होते.