शहादा। येथील गरीब नवाज वसाहतीती दीड महिन्या पूर्वी पाणी भरण्यावरून दोन गटात मारामारी झाली होती. त्यात दोन जखमी व नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा खून झाला होता. घटनेस कारणीभूत ठरणारा व घटनेनंतर फरार झालेला आरोपी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख अहमद (वय 45 ) यास नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकारी यांनी अटक केली. या आगोदर सात आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. रमजान महिन्यात गरीब नवाज वसाहतीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याही समस्या होती. येथे पाणी वाटप करण्यासाठी टँकंर गेले असता त्या ठिकाणी वाद झाला होता. माजी नागसेवक शेख मुख्तार उर्फ मुन्ना याने मुज्जफार अली लियाकत आली उर्फ मुज्जू तसेच सैय्यद नासीर लियाकत आली या दोघांना मारहाण करून जखमी केले व मुन्ना शेख हा देखील मारहाणीत जखमी झाला होता.
न्यायालयाच्या आवारात अटक
गरीब नवाज वसाहतीतील सुश्रुत नर्सिंग होम येथे जखमींना पाहण्यासाठी गेलेले नगरसेवक सद्दाम तेली यास तेथे संशयीत प्रेम याने तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याचा खून करुन पसार झाला होता. पंधरा दिवसांनी त्यास अटक केली. या घटनेत सात आरोपीना अटक केली आहे. तर दुसर्या फिर्यादीत पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या तक्रारीत माजी नगरसेवक शेख मेहमूद होता त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. शुक्रवारी खुनाच्या घटनेतील सात आरोपी यांची साक्ष नंदुरबार सत्र न्यायालयात होती. यावेळी दुसर्या घटनेतील आरोपी शेख मेहमूद उर्फ मुन्ना हा तेथे येणार असल्याची गुप्तवार्ता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. यानुसार न्यायालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला होता. न्यायालयाच्या परिसरात आरोपी मोकाट फिरत होता. दुपारनंतर तो बाहेर निघताच पसार होण्याचा बेतात असतांना त्यास अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक गिरीश पाटील सह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने हि कारवाई केली आहे.