जळगाव । मनसे नगरसेवक अनंत ऊर्फे बंटी जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची सत्यता पडताळणी करण्याची मागणी अखिल भारती छावा मराठा युवा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रेखा सुभाष पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नगरसेवक जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले होते असा मॅसेज सोशल मिडीयावर फिरत असल्याने मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरी हा प्रकार खरोखर घडला आहे किंवा नाही याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.