पिंपरी : महापालिकेच्या आवारात मंगळवारी (दि.16) अनधिकृत फलक फेको आंदोलन करणार्या भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात अनाधिकृत फलकांचा सुळसुळाट असून पालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा कामठे यांनी आरोप केला होता. कामठे यांनी पुरावा म्हणून दोन टेम्पो भरुन आणलेले अनधिकृत फलक पालिका प्रवेशद्वारात टाकले होते. महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या ‘भाजपा’ला कामठे यांनी या आंदोलनातून घरचा आहेर दिला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या परिसरात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगसेवकांनी कचरा आणून टाकला होता. शहरातील वाढत्या कचर्याच्या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी हा कचरा टाकण्यात आला होता. याप्रकरणी त्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.