नगरसेवक दिनेश घुले यांचा राजीनामा

0

आळंदीः आळंदी नगरपालिकेचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश घुले यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचे पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी दत्तात्रय लांघी यांनी सांगितले. आळंदी पालिकेचे स्वीकृत सदस्य दिनेश घुले यांनी इतर पदाधिकरी व पक्ष संघटनेत काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना या पदावर कामाची संधी मिळावी म्हणून पक्षादेश स्वीकारून राजीनामा दिल्याचे सांगितले. या पदावर दुसर्‍या व्यक्तीला संधी देण्याचा मार्ग यातून खुला झाला. आळंदीत यामुळे भाजपच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी उपाध्यक्ष दत्तात्रय काळे,शहर अध्यक्ष भागवत आवटे,प्रभारी अध्यक्ष संतोष गावडे,पांडुरंग ठाकूर,किशोर पवार,प्रवीण बवले आदी इच्छुक आहेत.