नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर!

0

पुणे-पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर हे आज अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे मानकर यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते जगताप यांनी आत्महत्या केली होती. जगताप यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नगरसेवक मानकर यांच्या नावाचा उल्लेख होता.