जळगाव- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक धिरज सोनवणे यांच्याकडून 200 गरजूंना किराणा वाटप करण्यात आले.गहू,तांदूळ,तेल,मिरची पावडर,हळद या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यासाठी गणेश मित्र मंडळाचे राजेंद्र कापूरे,विजय लोहार,राहुल निकम,अमोल गायकवाड,अंकुश पाटील,दीपक बाविस्कर,शुभम पाटील,विक्की पाटील,बाबू सैनी,राज गायकवाड,सोनल जाधव,सागर पाटील,विनय बजाज,नितीन पारधी,दीपक सावंत,शिवा कावना,हर्षल गायकवाड परिश्रम घेत आहे.