धुळे । पांझरा नदी काठी दोन्ही बाजुला साडेपाच कि.मी. लांबीच्या रस्त्यांना हरकत घेत कोर्टात धाव घेणार्या नगरसेवक नरेंद्र परदेशींना हायकोर्टाने फटकारले. आधी एक लाख रुपये भरा मगच सुनावणी होईल असे औरंगाबाद खंडपीठाने परदेशींना सुनावले आहे अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
पांझरा नदीकाठच्या साडेपाच कि.मी. लांबीच्या रस्त्यांचा कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पैसे जमा केले तरच जनहित याचिका ऐकणार असे आदेशच औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रविंद्र बोरडे आणि विभा कणकणवाडी यांनी दिले आहे. उच्चन्यायालयातून विकासकामात अडथळे आणण्यात राष्ट्रवादी आणि सेनेला आनंद मिळतो. धुळे शहर अविकसित रहावे यासाठी राष्ट्रवादी सेनेचे युती आहे. त्यांनी अनेक विकास कामांना आडकाठी आणली आहे असा आरोप आमदार गोटेंनी केले आहे. एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून न्यायालयात जमा करा तरच पुढची सुनावणी होईल असा आदेश न्यायालयाने पारित केला आहे.” त्यामुळे याचिकाकत्यार्ंना पुढील सुनावणीसाठी १ लाख रुपये ‘व्हाईट’ चे जमा करावे लागतील. असा टोला आमदार गोटेंनी लगावला आहे.