पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत लाभार्थी महिला व मुलींना सायकल व शिलाई मशीन न देता त्या बदल्यात रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी. ज्यामुळे मुलींना शालेय साहित्य व महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी मदत होईल. यामुळे भ्रष्टाचार रोखता येईल, अशी मागणी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पादचारी पूल उभारण्याची मागणी
आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौकात ग्रामपंचायत काळापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी पादचारी मार्ग होता. परंतु महामार्गावर ग्रेड सेपरेटर बांधण्यात आला; तेव्हा तो भुयारी मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. अनेकवेळा येथे अपघातही झाले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे पादचारी पूल तयार करावा, असेही कुटे यांनी म्हटले आहे.