अजित पवार यांच्या हस्ते
निगडी : नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेता योगेश बहल, नगरसेवक प्रविण भालेकर, पंकज भालेराव, दत्ता साने, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, मंगला कदम, वैशाली काळभोर, विनया तापकीर, उद्योजक दीपक जाधव, शाळेचे मुख्याधापक महादेव मिरगणे आदी यावेळी उपस्थित होते.
जनसंपर्क कार्यालयाची गरज
उद्घाटन प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध योजना व प्रभागातील विविध कामे अशा प्रकारच्या जनसंपर्क कार्यालयाची गरज आहे. ती गरज ओळखून प्रवीण भालेकर यांनी एक चांगले कार्यालय तयार केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या सोडविता येतील व महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. प्रतिकूल परिस्थितीत या भागातील जनतेने चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून दिले व प्रत्येक महापालिकेचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मनापासून साथ दिली. तळवडे, रूपीनगर परिसरातील जनतेच्या प्रेमापोटी उद्घाटनाला आलो.