नगरसेवक बंटी जोशींवर भाजपांकडून खोटे आरोप

0

जळगाव । मनसचे नगरसेवक बंटी जोशी यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खोटा आळ आणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. या मागणीची निःष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करून खोटा आळ घेऊन राजकारण करणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना बुधवार 22 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

डिवायएसपी सचिन सागंळे यांना निवेदन देतांना वैशाली विसपुते, लीना पवार, खुशबू बनसोडे, पार्वता भिल, कांचन सोनवणे, पद्माबाई सोनवणे, रत्ना अत्तरदे, देवश्री जंगले, यमुनाबाई सपकाळे, कोकीळा वानखेडे, रेणुका लोखंडे आदीं उपस्थित होते.

खोटे आळ घेणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा
भाजपाला राजकारण करावयाचे असेल तर भाजपाने विकासावर राजकारण करावे महापुरूषांच्या नाव घेवून राजकारण करू नये असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तर लोकांमध्ये जास्त रोष निर्माण होवून याचा फायदा भाजपा घेता येईल या दृष्टीकोनातून भाजपाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत. मनसचे नगरसेवक बंटी जोशी हे भाजपाला सर्व आघाड्यांवर उघडे पाडत असतात. भाजपाने केलेले आरोप कसे खोटे आहेत हे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे.